भूक लागलीय जेवण आणा, पत्नीने केली विनंती, पती जेवण आणायला गेला अन् पत्नी प्रियकरासोबत पळाली, रेल्वे स्थानकावर धक्कादायक प्रकार…

सध्या संपूर्ण देशात अनैतिक संबंध, लग्नानंतर प्रियकरासोबत अफेअर अशा अनेक घटना समोर येत आहेत. असे असताना आता अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुलतानगंज रेल्वे स्टेशन भागलपूर बिहार येथ एक कुटुंब ट्रेन पकडण्यासाठी येथे पोहोचले होते.

त्यानंतर पत्नीने पतीला भूक लागली. तिने पतीला नाश्ता घेऊन ये, असे सांगितले. यावेळी नवरा नाश्ता आणायला गेला. पती परत आला तेव्हा पत्नी बेपत्ता होती. यामुळे त्याला धक्काच बसला. या घटनेने तो हादरला असून मुलांनी सांगितले की आई काकासोबत पळून गेली.
पतीने पत्नीचा स्टेशन परिसरात शोध सुरू केला. मात्र ती कुठेच सापडली नाही. दोघांनाही तीन मुले आहेत. लग्नानंतर तो गुजरातमधील एका खासगी कंपनीत काम करू लागला, तर पत्नीनेही नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर तिने काम सुरू केले मात्र कामाच्या ठिकाणी ती एका तरुणाच्या प्रेमात पडली.

यानंतर त्यांचं भेटण बोलणं सुरू झालं. त्यांच्यात सबंध देखील निर्माण झाले. शुक्रवारी तो पत्नी आणि मुलांसह सबूर येथील घरी जात असताना ही घटना घडली. पती म्हणाला की, जेव्हा आम्ही सुलतानगंज स्टेशनवर पोहोचलो तेव्हा पत्नीने त्याला भूक लागल्याचे सांगितले.
थोडा नाश्ता आणा, पण मी नाश्ता आणायला गेलो तेव्हा माझी पत्नी तिच्या प्रियकरासह पळून गेली. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलीस दोघांनाही शोधत असून अजून कोणाचा तपास लागला नसल्याचे सांगितले आहे.