Bribe : शेतकऱ्याकडे लाच मागितली पण शेतकऱ्यानंच अधिकाऱ्याचा गेम केला, सातबारा नोंदीसाठी ८० हजारांची लाच मागणाऱ्या मध्यस्थाविरुध्द काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
Bribe : सातबारा नोंदीसाठी ८० हजारांची लाच मागणाऱ्या मध्यस्थाविरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मध्यस्थ व्यक्तीने थेऊरच्या तत्कालीन मंडल अधिकाऱ्यासाठी लाचेची मागणी केल्याचे तपासात समोर आले आहे.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे विभागाने ही कारवाई केली आहे. विजय सुदाम नाईकनवरे असे गुन्हा दाखल झालेल्या मध्यस्थाचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, ६५ वर्षीय तक्रारदार शेतकऱ्याची हवेली तालुक्यात कोलवडी येथे शेतजमीन आहे. या शेतजमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद आणि फेरफार मंजूर करण्यासाठी नाईकनवरे याने थेऊरच्या मंडल अधिकाऱ्यासाठी शेतकऱ्याकडे ८० हजार रुपयांची मागणी केली. Bribe
दरम्यान, याबाबत शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली.पडताळणी केल्यानंतर नाईकनवरे याने मंडल अधिकाऱ्यासाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून नाईकनवरे याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.