ब्रेकिंग! केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी दोन मोठे निर्णय, पुण्यासह मुंबईकरांनाही होणार मोठा फायदा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी महाराष्ट्रासाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या दोन निर्णयाचा थेट फायदा हा मुंबई आणि पुणेकरांना होणार आहे.यामध्ये पुण्यातील दोन महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांना मंजुरीनवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी महाराष्ट्रासाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या दोन निर्णयाचा थेट फायदा हा मुंबई आणि पुणेकरांना होणार आहे.यामध्ये पुण्यातील दोन महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये पहिला मार्ग हा खराडी ते खडकवासला असा आहे. तर दुसरा मार्ग नळ-स्टॉप ते माणिक बाग असा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात या दोन्ही मार्गाना मंजुरी देण्यात आल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सध्या लाईन 3, लाईन 1, लाईन 2A आणि लाईन 2B या मेट्रो मार्गिकेंचे कामे तर सुरुच आहेत. पण यामध्ये आणखी दोन मेट्रो प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत पुण्यातील मेट्रो लाईन 4 आणि 4A ला मंजुरी देण्यात आली आहे. खराडी ते खडकवासला हा लाईन 4 म्हणून मेट्रो प्रकल्प आहे. तर नळ-स्टॉप ते माणिक बाग हा 4A असा दुसरा मेट्रो प्रकल्प, अशा दोन्ही मेट्रो प्रकल्पांचा आजच्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात आला.या दोन्ही मेट्रो मार्गांसाठी एकूण 9858 कोटी रुपयांचा निधी नियोजित आहे. दोन्ही मार्ग हे एकूण 32 किमीचे असणार आहेत. पुढच्या पाच वर्षांत हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत आहे, अशीदेखील माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

या बैठकीत घेण्यात आलेला दुसरा निर्णय?

केंद्र सरकारने बदलापूर ते कर्जतपर्यंतच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकांना मंजुरी दिली आहे. बदलापूर-कर्जत कॉरिडोअरने लोकल वाहतुकीला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाला 1324 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे, अशीदेखील महत्त्वाची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. देण्यात आली आहे. यामध्ये पहिला मार्ग हा खराडी ते खडकवासला असा आहे. तर दुसरा मार्ग नळ-स्टॉप ते माणिक बाग असा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात या दोन्ही मार्गाना मंजुरी देण्यात आल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सध्या लाईन 3, लाईन 1, लाईन 2A आणि लाईन 2B या मेट्रो मार्गिकेंचे कामे तर सुरुच आहेत. पण यामध्ये आणखी दोन मेट्रो प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत पुण्यातील मेट्रो लाईन 4 आणि 4A ला मंजुरी देण्यात आली आहे. खराडी ते खडकवासला हा लाईन 4 म्हणून मेट्रो प्रकल्प आहे. तर नळ-स्टॉप ते माणिक बाग हा 4A असा दुसरा मेट्रो प्रकल्प, अशा दोन्ही मेट्रो प्रकल्पांचा आजच्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात आला.या दोन्ही मेट्रो मार्गांसाठी एकूण 9858 कोटी रुपयांचा निधी नियोजित आहे. दोन्ही मार्ग हे एकूण 32 किमीचे असणार आहेत. पुढच्या पाच वर्षांत हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत आहे, अशीदेखील माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
या बैठकीत घेण्यात आलेला दुसरा निर्णय?
केंद्र सरकारने बदलापूर ते कर्जतपर्यंतच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकांना मंजुरी दिली आहे. बदलापूर-कर्जत कॉरिडोअरने लोकल वाहतुकीला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाला 1324 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे, अशीदेखील महत्त्वाची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.