ब्रेकिंग! सातारा जिल्ह्यात खळबळ, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकरचा छापा…

सातारा : जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकल्याची माहिती आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला होता. आता संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं छापा टाकला गेला आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आज सकाळीच आयकर विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे. सहा वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यावेळी समर्थकांनी गर्दी केली होती.

बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नाही. तसेच रघुनाथराजे नाईक निंबाळकर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या आहेत. हे दोघेही रामराजे यांचे बंधू आहेत. यावर अजून कोणी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. यामुळे मात्र राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे आधीपासूनच शरद पवार यांच्या पक्षात आहेत तर संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. यामुळे अजित पवारांना धक्का बसला होता. मात्र रामराजे हे पुन्हा अजित पवारांसोबत दिसून आले होते.
दरम्यान, संजीवराजे नाईक निंबाळकर हे येत्या काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्यापूर्वीच हा छापा टाकण्यात आला आहे. यामुळे येणाऱ्या काळात अजून काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.