ब्रेकिंग! जळगावात भीषण अपघात, ट्रेनला आग लागल्याच्या भीतीनं प्रवाशांच्या उड्या, दुसऱ्या ट्रेननं १२ जणांना उडवलं, १० प्रवाशांचा मृत्यू…


जळगाव : जळगावमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याच्या भीतीनं काही प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसनं त्यांना चिरडलं. या अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. जळगावातील परांडा स्टेशनजवळ हा अपघात झाला. जळगावातील परधाडे स्टेशनजवळ पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्यानंतर समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने त्यांना चिरडल्याची घटना घडली. तसेच 40 हून अधिक प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे.

या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आलं असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, परधाडे स्टेशनच्या आधी ट्रेनचा ब्रेक लागल्याने घर्षण झालं आणि आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यावेळी प्रवाशांनी उड्या मारायला सुरूवात केली.

त्यामध्ये अनेकजण कर्नाटक एक्स्प्रेसच्या खाली आले. अचानक ब्रेक लावल्याने त्या ठिकाणी आगीच्या ठिणग्या उडाल्या. नंतर काही प्रवाशांनी ही आग लागल्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे भयभीत झालेल्या त्या प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. पण समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना चिरडले.

यामुळे एकच खळबळ उडाली असून याबाबत बचावकार्य सुरू आहे. सध्या जखमींवर उपचार केले जात आहेत. या ठिकाणी बचाव पथक पोहोचल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मदत कार्य लवकरात लवकर पोहोचवण्याचे निर्देश त्यांना दिले आहेत असं जळगावच्या खासदार स्मिता वाघ म्हणाल्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!