ब्रेकिंग! सौरभ गांगुलीच्या कारचा भीषण अपघात, दुर्गापूर महामार्गावर घडली घटना…

दुर्गापूर : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, दिग्गज खेळाडू सौरभ गांगुलीच्या कारच अपघात झाला. सुदैवाने सौरभ गांगुली या अपघातातून थोडक्यात वाचला असून त्याला दुखापत झालेली नाही. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सौरव गांगुली बर्धवान येथे जात होता. त्याच दरम्यान हा अपघात झाला.

दंतनपुराजवळ एक ट्रक अचानक गांगुलीच्या ताफ्याच्या समोर आला. त्यामुळे कार चालकाला अचानक ब्रेक लावावा लागला. त्यामुळे मागून येणाऱ्या भरधाव कार एकमेकांना आदळल्या. त्यातील एक कार गांगुलीच्या कारला धडकली. अपघातानंतर याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. तो देखील काही काळ याठिकाणी होता.
सौरव गांगुलीच्या मागे असलेल्या कारने त्याच्या रेंज रोव्हरलाही धडक दिली. मात्र, कोणतीही जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाले नाही. गाडीचे नुकसान झाले आहे. ताफ्यातील दोन वाहनांचे किरकोळ नुकसान झाल्याचे वृत्त आहे. या अपघातानंतर सौरवला एक्सप्रेसवेच्या बाजूला सुमारे 10 मिनिटे वाट पहावी लागली.

तो वर्धमान विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पुढे निघाला. या अपघातात गांगुली थोडक्यात बचावला असून मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र पुढील वाहने थांबल्याने अचानक हा अपघात झाला आहे. यावेळी काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष म्हणून त्याने जबाबदारी पार पाडली आहे. टीम इंडियाचा आक्रमक आणि प्रभावी कर्णधार म्हणून सौरव गांगुलीची ओळख आहे. टीम इंडियाने त्याच्या नेतृत्वात अनेक ऐतिहासिक विजय मिळवले. यामुळे त्याचे लाखो चाहते आहेत.