ब्रेकिंग! पंकजा मुंडेंच्या पीएचा पाय आणखी खोलात ; फॉरेन्सिक टीमला सापडला मोठा पुरावा…


पुणे : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जेच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी विविध खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी विशेष तपास पथके कार्यरत करण्यात आली आहेत.त्यातच आता फॉरेन्सिक पथक आणि डॉक्टरांचे एक पथक हे अनंत गर्जेंच्या मुंबईतील घरी दाखल झाले आहे. या गंभीर गुन्ह्याच्या तपासाचा एक भाग म्हणून महत्त्वाचे धागेदोरे आणि परिस्थितीजन्य पुरावे हस्तगत करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञ हे गर्जेंच्या घराची झडती घेत आहेत. गौरी गर्जे यांनी नेमके कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली, याबद्दलचे महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न या पथकाकडून सुरु आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अनंत गर्जे हे मुंबईतील वरळी परिसरातील बीडीडी चाळीत भाड्याने राहत होते. त्यांच्या पत्नी गौरी गर्जे यांच्या आत्महत्येपूर्वी किंवा त्यानंतर घटनास्थळी काही महत्त्वाचे बदल झाले आहेत का? तसेच त्यांनी आत्महत्या करतेवेळी काय वस्तूंचा वापर केला होता याचा तपास फॉरेन्सिक विभागाकडून केला जाणार आहे. तसेच यावेळी काहीही सुसाईड नोट सापडते का याचाही तपास फॉरेन्सिक पथकाकडून करण्यात येणार आहे. या पुराव्यांवरून ही आत्महत्या आहे की अन्य काही याबद्दलची माहिती समोर येणार आहे.याप्रकरणी डॉक्टर राजेश ढेरे यांनी प्रतिक्रिया दिली. आता आम्ही पोलिस स्टेशनला जात आहोत. आम्ही जे काही आहे ते संबंधित रिपोर्टिग ऑफिसरला सांगू. बाकी जी काही माहिती सापडली आहे, त्याबद्दलही त्यांना कळवू, असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान गौरी यांच्या कुटुंबियांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी विशेष तपास पथके कार्यरत झाली आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!