Breaking News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना….
Breaking News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता सरकार पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. शिंदे सरकारकडून मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांसह एक महत्त्वाची बैठक घेतली.
या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी विभागाने भाडेतत्वावर जागा घेऊन तात्काळ वसतीगृहे सुरू करण्याचे निर्देश देऊन त्याबाबतचा प्रत्येक आठवड्याला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे. Breaking News
तसेच मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नाशिक या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रति वर्ष प्रति विद्यार्थी ६० हजार रुपये निर्वाह भत्ता, विभागीय ठिकाण, विभागीय मुख्यालय व ‘क’ वर्ग महापालिका असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रति वर्ष ५१ हजार रुपये निर्वाहभत्ता दिला जाईल.
इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी ४३ हजार रुपये निर्वाहभत्ता तसेच तालुक्याच्या ठिकाणी ३८ हजार रुपये निर्वाह भत्ता दिला जाईल”, अशी माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य शासन गांभीर्याने कार्यवाही करीत आहे. त्यासाठी आता मराठवाड्यासह राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून कुणबी नोंदी तपासण्यासाठी युद्धपातळीवर मोहिम हाती घ्यावी.
त्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी आणि त्यांच्या नियंत्रणाखाली कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून द्यावी. त्यांना आवश्यक ते मनुष्यबळ, साधनसामुग्री देखील तातडीने देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
मंत्रालयस्तरावर अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त आणि जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी याबाबत संनियंत्रण करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.