Breaking News : आरक्षणाच्या निर्णयासाठी सरकारला महिनाभराचा अल्टिमेटम, जरांगे पाटलांचा मोठा निर्णय…


Breaking News जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांची मनधारणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Breaking News)

बैठकीत राज्य सरकारने महत्त्वाचा ठराव पारित केला. त्यानंतर आज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आरक्षणाचा निर्णय अंतिम टप्प्यात आल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे हे जालन्यातील अंतरवाली गावात गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, तोपर्यंत तसूभरही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

आज पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांनी जनतेशी चर्चा केल्याशिवाय निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट केले. सरकारने एका महिन्याची मुदत मागितली असून एका महिन्यात काय निर्णय घेणार? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. तसेच सरकारला एका महिन्याचा वेळ दिला तरी, उपोषण स्थळ सोडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सरकारला ४० वर्षे आपण दिली आहेत. सरकारने एका दिवसात जीआर काढला आहे, पण ते न्यायालयात टिकणार नाही. महिन्याचा वेळ दिला तर न्यायलयात टिकणारे आरक्षण देणार का? अशी विचारणा त्यांनी सरकारकडे केली.

तसेच आरक्षणाचे पत्र हातात मिळेपर्यंत मी घरी जाणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तसेच “आपण एकत्र असल्याने सरकार आपल्यासमोर झुकले, असेही ते यावेळी म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!