ब्रेकिंग! पुण्यात डेमू ट्रेनच्या डब्याला आग, प्रचंड धूर, प्रवाशांची पळापळ, नेमकं काय घडलं?

पुणे : सध्या दौंडहून पुण्याला येणाऱ्या डेमू ट्रेनमध्ये सकाळी एक थरारक घटना घडली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सकाळी दौंडवरून निघालेल्या शटल ट्रेनच्या एका डब्यातील टॉयलेटमध्ये अचानक आग लागली. यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. यामुळे अनेकांनी पळापळ सुरू केली.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेमुळे ट्रेनमध्ये काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत तपास सुरू असून सध्या धूर आटोक्यात आणला असून तपास केला जात आहे. यामध्ये कोणी जखमी झाले नाही.
ही गाडी दौंडहून पुण्याला येत असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी सकाळी 07:05 वाजता दौंडवरून निघालेल्या शटल ट्रेनच्या एका डब्यातील ही घटना घडली. यामुळे लगेच तत्काळ गाडी थांबवण्यात आली. नंतर प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे.
ही आग टॉयलेटमध्ये अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेमुळे ट्रेनमध्ये काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असून रेल्वेलाइन देखील सुरळीत करण्यात आली आहे.