ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रकृती बिघडली, नियोजित सगळे कार्यक्रम रद्द…

पुणे : राज्यचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती बिघडली असल्याचे समोर आले आहे. त्यांनी नाशिक दौरा मध्येच सोडून नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द केले. यानंतर ते पुण्याला रवाना झाले. आजही अजित पवारांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. त्यांना बरं वाटत नसल्याने त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे.

अजित पवार रविवारी नाशिक दौऱ्यावर गेले होते. त्यांनी आमदार सरोज आहेर यांच्या एका कार्यक्रमाला ते हजर होते. आज पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार सोमवारी सकाळी मुंबईला रवाना झाले आहेत. ते मुंबई विश्रांती घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
रविवारी भाषणात अजित पवार यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले होते. आपण आज दोन गोळ्या घेतल्या आहेत, तरीही मला बरं वाटत नाहीये. मी जास्त बोलणार नाही, असे अजित पवारांनी सांगितले होते. यावेळी त्यांनी जास्त बोलणं देखील टाळलं होतं. त्यानंतर त्यांनी नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द करत पुण्याला आले होते.

असे असताना मात्र रात्री उपचार घेतल्यानंतरही त्यांना अजून बरं वाटत नाही. त्यामुळे त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. यानंतर ते मुंबईला रवाना झाले आहे. मुंबईतल्या निवासस्थानी ते आराम करू शकतात. यामुळे येणाऱ्या काळात ते सार्वजनिक कार्यक्रम उपस्थित राहणार नाहीत, असेही बोलले जात आहे.
दरम्यान, अजित पवार आजारी पडल्यावर अनेक राजकीय घडामोडी घडतात, असेही अनेकदा सांगितले जाते. आता मात्र येणाऱ्या काळात शरद पवार गटातील अनेक ठिकाणी अजित पवार यांच्याकडे येणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय राजकीय घडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.