ब्रेकिंग! लाल किल्ला कार स्फ़ोटाप्रकरणी मोठी अपडेट ; मास्टरमाईंड उमर मोहम्मदच घर उडवलं, सुरक्षा दलाची मोठी कारवाई


दिल्ली : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये स्फोट झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा एजन्सीकडून कसून तपास सुरू आहे.दरम्यान, या बॉम्ब स्फोट प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद याचे पुलवामा येथील घर सुरक्षा यंत्रणांनी आयईडीने उडवून दिले आहे. दहशतवादविरूद्धच्या कारवाईचा एक भाग म्हणून सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असल्याची माहिती समोर आली आहे.

लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या तपासात अनेक महत्वाचे खुलासे झाले आहेत. गुरूवारी फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये या स्फोटाशी संबंधित आणखी एक कार आढळली. पोलिसांच्या माहितीनुसार, ही कार डॉ. शाहिन शाहिद यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. ज्याला आधीच ‘व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल’ प्रकरणात आधीच अटक करण्यात आली आहे.
तसेच या प्रकरणातील मास्टर माईंड डॉ. उमरचे घर उडवले. मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण कारवाई नियंत्रित पद्धतीने पार पडली.

दरम्यान प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. उमर मोहम्मद, डॉ. मुझम्मिल अहमद आणि डॉ. शाहीन शाहिद यांनी एका एन्क्रिप्टेड स्विग्स मेसेजिंग अॅपद्वारे त्यांच्या दहशतवादी मोहिमेचे नियोजन आखले. स्फोटस्थळावरून मिळालेल्या डीएनए नमुन्यांवरून, डॉ. उमर लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेली पांढऱ्या रंगाची हुंडई आय २० कार चालवत होते. सध्या या प्रकरणातून आणखी कोणती मोठी माहिती लागते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!