ब्रेकिंग! रूपाली ठोंबरे पाटलांना मोठा धक्का ; आधी प्रवक्त्यांच्या यादीतून डच्चू, आता थेट…..

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. अशातच आता,पुण्यातील माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांना राष्ट्रवादी पक्षाने आणखीन एक धक्का दिला आहे. या आधी त्यांना प्रवक्त्याच्या यादीतून हटवण्यात आलं होतं त्यानंतर आता स्टार प्रचारकांच्या यादीतूनही त्यांना डच्चू मिळाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. प्रवक्त्यांच्या यादीत स्थान न मिळालेले आमदार अमोल मिटकरी यांची स्टार प्रचारकांच्या यादीत वर्णी लागली आहे. तर पुण्यातील माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांना मात्र स्टार प्रचारकांच्या यादीतही डच्चू मिळाला आहे. त्यामुळे रुपाली पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.

काही दिवसांपूर्वीच आलेल्या प्रवक्त्यांच्या यादीत अमोल मिटकरी, रुपाली पाटील ठोंबरे यांना स्थान मिळालं नव्हतं. स्वपक्षीय नेत्या रुपाली चाकणकर यांच्याविरोधात जाहीर टीका केल्याने रुपाली पाटील यांना वगळल्याची चर्चा होती. यानंतर ठोंबरेंनी अजित पवार यांची भेट घेण्याचंही जाहीर केलं होतं, मात्र ही भेट झाली नाही. त्यानंतर आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत आता मिटकरींना स्थान मिळालं आहे, परंतु रुपाली ठोंबरेंनाही प्रवक्तेपदानंतर स्टार प्रचारकांच्या यादीतूनही दूर ठेवल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आल आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस स्टार प्रचारक यादीत प्रमुख नेते कोण कोण?
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रताप पाटील – चिखलीकर, माजी मंत्री नवाब मलिक यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
याशिवाय नेते सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक – शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार राजेंद्र जैन, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, लहू कानडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी, महेश शिंदे, श्रीमती राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई ठाकरे, नजीब मुल्ला, श्रीमती प्रतिभाताई शिंदे, विकास पासलकर आदींचा समावेश आहे.
