ब्रेकिंग! बसचा पुन्हा एकदा मोठा अपघात, ५० फूट खोल दरीत बस कोसळून ७ भाविकांचा जागीच मृत्यू..


गंगोत्री : सध्या देवदर्शनाहून माघारी येत असताना एका बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ७ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २६जखमी झाले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

देवदर्शनासाठी गुजरातहून काही भाविक आले होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास उत्तरकाशी-गंगोत्री महामार्गावरील गंगनानीजवळ ५० फूट खोल दरीत बस कोसळली. एनडीआरएफच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातातील २६ जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यामध्ये मृत्युचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शोक व्यक्त करत जिल्हा आरोग्य प्रशासनाला जखमींवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, हा भीषण अपघात होता, याचे कारण अद्याप समोर आले नाही. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून 0134 222722, 222126 हेल्पनंबर जारी करण्यात आला आहे.

त्यावर संपर्क करून जखमींची माहिती घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांनी या घटनेमुळे मोठा हंबरडा फोडला. अपघातस्थळी मोठी गर्दी देखील झाली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!