देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर ठेवला बॉम्ब..!

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आला आहे. नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये हा फोन आल्याची माहीती समोर आली आहे. काल (सोमवार) रात्री 2 च्या सुमारास हा बॉम्ब ठेवल्याचा फोन आला होता.
या घटनेमुळे फडणवीस यांच्या घरी रात्री बॉम्ब शोधक पथक आणि पोलीस सुरक्षा वाढविली होती. फोन करणारा व्यक्ती हा कन्हान भागातील राहणारा असून घरची वीज गेली म्हणून रागात बॉम्ब ठेवल्याचा फोन त्याने केला होता. या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Views:
[jp_post_view]