विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, कोणाला मिळाली संधी? नावं आली समोर…

मुंबई : सध्या राज्यात निवडणूक आयोगाने राज्यातील विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे इच्छुकांनी पक्षाकडे फिल्डिंग लावली आहे. भाजपासह सध्या शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू असून 27 मार्चला या पाच जागांसाठी मतदान होणार आहे.
10 मार्चपासून अर्जाला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर महायुतीमधील आमदारांच्या जागांवर कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. भाजपकडून तीन नावे दिल्लीला पाठविण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
भाजपच्या 3 आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या खात्यात प्रत्येकी एक-एक जागांसाठी ही निवडणूक होत आहे. आता, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र भाजपकडून दिल्लीसाठी दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना संधी दिली गेली असल्याचे सांगितले जात आहे.
या तीन नेत्यांची नावे दिल्लीला पाठविण्यात आल्याचे समजते. विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यातील असून राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाची एक जागा आहे. यामुळे अनेकांनी आपल्याला संधी मिळावी, यासाठी तयारी केली आहे. तसेच राष्ट्रवादीकडून देखील अनेकजण इच्छुक आहेत.
राष्ट्रवादीकडून पक्षात सध्या झिशान सिद्धकी, आनंद परांजपे, सुनील टिंगरे, सुरेश बिराजदार, संजय दौंड आणि सुबोध मोहिते इच्छुक आहेत. तसेच पुण्यातुन देखील अनेकजण इच्छुक आहेत. मात्र, एकच जागा राष्ट्रवादीची असल्याने कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.