पुण्यात पुन्हा भाजपचीच पॉवर ; आयोगाकडून महापालिकेच्या 11 प्रभाग रचनेत बदल, हरकतीच्या सुनावणीचा केवळ देखावा..


पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब केल्याने महापालिका निवडणुकीतील महत्वाचा टप्पा मार्गी लागला आहे. प्रारूप रचनेच्या तुलनेत आयोगाकडून ११ प्रभागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता हरकती सूचनांच्या सुनावणीचा केवळ दिखावा करण्यात आल्याच स्पष्ट झाल आहे.

महापालिकेच्या 41 प्रभागांमधून 5 हजार 922 हरकती नोंदवण्यात आल्या होत्या.त्यापैकी केवळ 1 हजार 329 हरकती पूर्णतः तर 69 हरकती मान्य करण्यात आल्या आहेत. तब्बल 4524 हरकती अमान्य करण्यात आल्या आहेत. 41 पैकी 28 प्रभागामध्ये काही बदल करण्यात आला नाही. आयोगाकडून 11 प्रभागांमध्ये फक्त बदल करण्यात आले आहेत. सर्वाधिक बदल प्रभाग क्रमांक ३८ (आंबेगाव-कात्रज) आणि प्रभाग क्रमांक १५ (नऱ्हे-वडगाव बुद्रुक) झाले आहेत. बदल करण्यात आलेल्या बहुतांश प्रभागांमध्ये तुटलेले प्रगणक गट (एबी) जोडण्यात आले आहेत. आठ प्रभागांच्या नावांमध्ये बदल करण्यात आला आहे.

या अंतिम प्रभाग रचनेत सर्वाधिक बदल दक्षिण पुण्यात झाले आहेत. प्रभाग क्रमांक ३८ (आंबेगाव-कात्रज) हा पाच सदस्यीय प्रभाग आहे. पूर्वीच्या तुलनेत या प्रभागामध्ये वाढ करण्यात आली असून, बालाजीनगर, आंबेगाव खुर्द, आंबेगाव दबाडी (शिवसृष्टी) हा भाग जोडण्यात आला आहे.प्रारूप आराखड्यात नऱ्हे-वडगाव बुद्रुक (प्रभाग क्रमांक ३४) या प्रभागात असलेला कोळेवाडी, जांभूळवाडीचा परिसरही याच प्रभाग क्रमांक ३८ ला जोडण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रभाग छोट्या विधानसभा मतदारसंघाइतका झाला आहे. दक्षिण पुण्यातील एका बड्या नेत्याला बालाजीनगरचा सर्व भाग एकाच प्रभागामध्ये यावा, अशी अपेक्षा होती. प्रारूप आराखड्यात बालाजीनगरचे तीन तुकडे पडले होते. अंतिम प्रभाग रचनेत बालाजीनगर प्रभाग क्रमांक ३८मध्ये एकत्र करण्यात आले आहे. या प्रभागात अनेक दिग्गज एकत्र येणार असल्याने येथील निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!