BJP West Bengal : धक्कादायक! प्रचार करत असताना भाजप खासदाराने महिलेचा जबरदस्ती घेतला किस, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ…


BJP West Bengal : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रचार सुरू असून देशातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसतंय. त्यातल्या त्यात भाजप विरूद्ध ममता बॅनर्जी यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे पश्चिम बंगालमध्ये राजकारणाचा वेग आला आहे. त्यातच बंगालमधील भाजपच्या एका उमेदवाराने प्रचार करताना असं काही कृत्य केलं की त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

बंगालमधील उत्तर मालदा मतदारसंघातील भाजपचे खासदार आणि पक्षाचे लोकसभा उमेदवार खगेन मुर्मू यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचारादरम्यान एका महिलेच्या गालावर चुंबन घेतल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.

खगेन मुर्मू या महिलेचे चुंबन घेत असल्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर समोर आला आहे. सोमवारी श्रीहीपूर या गावात प्रचाराला गेले असताना त्या उमेदवारानं महिलेचा मुका घेतला. यावेळी त्याचे फेसबुक लाईव्ह देखील सुरू होते.

त्यामध्ये हा प्रकार रेकॉर्ड झाला. आणि त्याचबरोबर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. आता सध्या सगळीकडे हा चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकारांमुळे नेटकऱ्यांनी आणि मतदारांनी भाजप सरकारवर टीका केली. BJP West Bengal

दरम्यान, संबंधित महिलेने देखील खगेन मुर्मू यांच्या या कृतीचा बचाव केला आणि व्हायरल झालेल्या चित्रांमधील अश्लीलता निदर्शनास आणणाऱ्यांवर टीका केली. महिलेने सांगितले की जर एखाद्या पुरुषाने आपल्या मुलीप्रमाणे एखाद्या महिलेचे चुंबन घेतले तर त्यात काहीही गैर नाही. असं स्वतः ती महिला म्हणाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!