भाजपकडून मंत्रीपदासाठी आमदारांना फोन कॉल ! निलेश राणे , मंगलप्रभात लोढा , शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपद निश्चित ….

नागपूर : भाजपकडून अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी आमदारांना फोन जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपच्या इच्छूक आमदारांमध्ये असलेल्या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळत आहे, आणि संभाव्य मंत्र्यांची नावे हळूहळू स्पष्ट होऊ लागली आहेत.
भाजपकडून नितेश राणे, पंकज भोईर, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले यांची मंत्रीपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. भाजपकडून विविध प्रादेशिक, सामाजिक, आणि जातीय गटांचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न आहे.
दरम्यान, ओबीसी, मराठा, आणि शहरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी योग्य प्रतिनिधींची निवड केली जात असल्याचे दिसून येत आहे.
मंत्रिमंडळात विदर्भ, मराठवाडा, कोकण, आणि पश्चिम महाराष्ट्राचा समतोल राखण्यावर भर दिसून येत आहे. पाच वाजता होणाऱ्या या सोहळ्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Views:
[jp_post_view]