भाजपने गमावले दक्षिणेतील एकमेव राज्य, लोकसभेलाही फटका बसणार? काँग्रेसची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल

कर्नाटक : आज कर्नाटक विधानसभेचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये काँग्रेस 132 जागांच्या जवळपास पोहचली आहे. तर भाजप (BJP) 63 जागांवर आघाडीवर आहे.

तर जेडीएस (JDS) 21 जगांवर आघाडीवर आहे. येथे भाजपाची व काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळं संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागले आहे.
आतापर्यत काँग्रेस आघाडीवर असल्याने कार्यकर्ते आनंदात आहेत. आता राज्यात जवळपास काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, हे ऐतिहासिक बहुमत आहे. त्यामुळे काँग्रेससाठी कर्नाटकातील विजय अतिशय महत्त्वाचा आहे. दक्षिणेतील एकमेव राज्यात भाजपचे सरकार होते, ते सरकारही गेल्यामुळे भाजपसाठी हो धोक्याची घंटा मानली जात आहे.
कर्नाटकमध्ये भाजपने जोरदार प्रचार केला होता. केंद्रीय मंत्री याठिकाणी तळ ठोकून होते. मात्र भाजपचा याठिकाणी पराभव झाला आहे.