चंद्रपूरमध्ये खळबळ! भाजप नेत्याच्या पत्नीची गोळ्या घालून हत्या, कोळसा व्यवसायातून गोळीबार झाल्याचा दावा…


चंद्रपूर : चंद्रपूरच्या भाजयुमो नेत्याच्या पत्नीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी रात्री ९ च्या सुमारास घडली. सदर नेता कोळसा व्यवसायाशी संबंधित आहे. त्यामुळे ही घटना याच व्यवसायाशी संबंधित वादातून घडल्याचा दावा केला जात आहे.

पूर्वशा सचिन डोहे (२७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. द्रपूर भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या पत्नी आहेत.

त्यांना ३ गोळ्या लागल्या होत्या. चंद्रपूरच्या राजुरा शहरातील सोमनाथपूर वॉर्डात ही घटना घडली. या घटनेत लल्ली शेरगील नामक ३५ वर्षीय व्यक्तीही जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, सचिन डोहे हे कोळसा व्यवसायाशी संबंधित आहेत. लल्ली शेरगील त्यांच्याकडे काम करतो. रविवारी रात्री लल्ली याचा २ अज्ञात इसमांशी वाद झाला. त्यानंतर त्या व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला.

यामुळे जिवाच्या आकांताने लल्लीने सचिन यांच्या घराकडे धाव घेतली. आवाज ऐकून पूर्वशा घराबाहेर आल्या असता त्यांना या गोळीबारात ३ गोळ्या लागल्या. त्यात त्या जागीच ठार झाल्या. तर लल्ली जखमी झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी लल्ली यास चंद्रपूरला हलवले. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!