सर्वांत मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर धनंजय मुंडे राजीनामा देणार……

बीड : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठे अपडेट समोर आले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचे आता समोर आले आहे. याबाबत मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा देणार आहेत.
विरोधकांनी तसेच संपूर्ण राज्य या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. विधीमंडळ अधिवेशनात विरोधक आक्रमक झाले आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत सर्वांनी मागणी केली होती. अखेर ते राजीनामा देणार आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे.
त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध समोर आल्यानंतर मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर मुंडे यांनी आज राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कालच राजीनामा देण्यास सांगितले होते.
तसेच राष्ट्रवादीतही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून दोन गट पडले असल्याची माहिती समोर आली होती. तर, दुसरीकडे करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार असल्याचे वक्तव्य करून रविवारी खळबळ उडवून दिली होती.