सर्वात मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव कारखाना निवडणूकीत विजयी, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष…


बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखानाच्या निवडणुकीतील पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. अभियांत्रिकी भवन मध्ये सध्या मतमोजणी सुरू आहे. या ठिकाणी ब वर्ग प्रतिनिधी मतदारसंघाची मोजणी झाल्यानंतर अजित पवार यांना 91 होते तर विरोधी पक्षाच्या उमेदवाराला 10 मते मिळालेले आहेत.

साधारणपणे प्रचंड फरकाने अजित पवार यांनी मतदारसंघातून विजय मिळवलेला आहे. आत्ताची ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार वर्ग प्रतिनिधी मतदारसंघातून उभे होते. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीसाठी आणि या मतदारसंघासाठी 102 संस्थांची प्रतिनिधी मतदार करत होते.

या मतदानापैकी 101 मतदारांनी मतदान केलं त्यामध्ये 99 पुरुष तर दोन महिलांचा समावेश होता. मतदारांपैकी विरोधी उमेदवाराला फक्त दहा मते मिळाले आहेत. हा विजय अपेक्षित होता. ब वर्गातून अजितदादांना ९१ इतकी मते मिळाली. तर भालचंद्र बापूराव देवकाते यांना १० मतांवर समाधान मानावे लागले. अपेक्षेनुसार अजितदादांनी ब वर्गातून विजय मिळवला आहे.

आजच्या मतमोजणीत निळकंठेश्वर पॅनलची विजयी सुरुवात झाली असून पुढे काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या ठिकाणी प्रचंड बंदोबस्त आहे. या ठिकाणी चुरस आहे. मतमोजणी देखील अशा स्वरूपाची आहे की छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने मतमोजणीच्या वेळी काही गोंधळ पाहायला मिळाला होता. यामुळे सध्या बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!