MPSC उमेदवारांसाठी मोठी अपडेट! गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला होणार परीक्षा

पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महत्त्वाची अपडेट जारी केली आहे. आयोगाने ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी ही परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार होती. मात्र, आता परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ही परीक्षा ३ जानेवारी २०२७ रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन ओएमआर (Offline OMR) पद्धतीने घेण्यात येणार आहे.

परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्रे तसेच प्रवेशपत्राबाबतची (Admit Card) सविस्तर माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर योग्य वेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता MPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देऊन अपडेट तपासण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.


परीक्षेचे सुधारित वेळापत्रक
जाहिरात क्रमांक: 017/2026
जाहिरात दिनांक: 25 जून 2026
जुनी परीक्षा तारीख: 25 ऑक्टोबर 2026
नवी सुधारित परीक्षा तारीख: 3 जानेवारी 2027
परीक्षा पद्धत: ऑफलाइन ओएमआर (Offline OMR)
परीक्षा केंद्रे: राज्यातील सर्व जिल्हा केंद्रे
त्यामुळे गट-क संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आता सुधारित वेळापत्रकानुसार आपल्या अभ्यासाचे नियोजन करावे लागणार आहे. प्रवेशपत्र आणि परीक्षेच्या वेळेबाबतची पुढील माहिती MPSC कडून अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.