शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अवकाळी, गारपीटसाठी अनुदान मंजूर, राज्य सरकारचा निर्णय..

मुंबई : राज्य सरकार विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देते. राज्यात फेब्रुवारी ते मे २०२५ च्या दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपयांचे अनुदानास वितरणास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, जालना जिल्ह्यासह पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, गडचिरोली, चंद्रपूर, अहिल्यानगर, सिंधुदुर्ग, ठाणे, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, वर्धाम गोंदिया जिल्ह्यांचा समावेश आहे.
राज्य सरकारने एकूण ३४ जिल्ह्यातील ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरण अर्थात डीबीटीच्या माध्यमातून अनुदान वाटप करण्यात येणार आहे. अनुदानासाठी शेतकऱ्यांनी केवायसी करून घेणे आवश्यक आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.

असे असताना अलीकडेच राज्य सरकारने या अनुदानात कपात करत जुन्या दराने निविष्ठा अनुदान वितरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. याबाबत अजून पुढील आदेश आला नाही.
दरम्यान, शेतकऱ्यांना यावेळी मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाचा फटका बसला होता. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत होते. याबाबत आता निर्णय झाला असून येणाऱ्या काळात पावसाळा सुरु झाला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरु आहेत.