खुशखबर!! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा, गॅसच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या…


नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच देशभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत १४. ५० रुपयांची घट झाली आहे. १९ किलोंच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात झाली आहे.

ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी १९ किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १४.५० रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना मोठा फायदा होईल, कारण व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी झाले आहेत.

दिल्लीतील नवीन दरानुसार, १९ किलोग्रॅम वजनाचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आता १८०४ रुपयांना मिळणार आहे, तर मुंबईत त्याची किंमत १७5५६ रुपये, चेन्नईमध्ये १९६६ रुपये आणि कोलकातामध्ये १९११ रुपये आहे. मागील काही महिन्यांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सलग वाढ झाल्याने ही कपात व्यवसायिकांसाठी महत्त्वाची आहे.

दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती गॅस सिलिंडरचे दर दिल्लीमध्ये ८०३ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये, चेन्नईमध्ये ८१८.५० रुपये आणि कोलकातामध्ये ८२९ रुपये आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरचे दर १०० रुपयांनी कमी झाले होते, आणि त्यानंतर या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group