मोठी बातमी!! बारामतीत रेल्वेखाली सापडून महिलेचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू..

बारामती : बारामतीत रेल्वेखाली पडून एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. येथील मेहता मल्टीकेअर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल पासून काही अंतरावर रेल्वेखाली सापडून एका महिलेचा मृत्यू झाला. तिची ओळख पटलेली नाही. याबाबत तपास सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की, बारामती शहरातून दौंडकडे निघालेल्या रेल्वेखाली सापडल्याने या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेची ओळख पटली नाही. यामुळे याबाबत अजून सविस्तर माहिती समोर आली नाही. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे. अंदाजे 30 ते 35 वयोगटातील ही महिला असून या घटनेनंतर या ठिकाणी गर्दी झाली होती.
आज दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. या महिलेने आत्महत्या केली की दुसरं काही घडलं याबाबत तपास केला जात असून तिची ओळख पटल्यावर याबाबत माहिती समोर येईल, पोलिसांनी याबाबत पंचनामा केला असून तपास सुरू आहे.