मोठी बातमी! शिवसेना-भाजप वेगळे लढणार? फडणवीसांचं मोठं विधान


महाराष्ट्रच्या राजकारणात महायुतीत फूट पडणार का, यावरून जोरदार चर्चा रंगली असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक पण टोकदार प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेतील काही नेत्यांकडून 2029 मध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत दिले जात असताना फडणवीस यांनी थेट बोट एकनाथ शिंदे यांच्याकडे दाखवले.

“शिवसेनेत बोलण्याचा अधिकार फक्त शिंदेंनाच आहे. त्यांनी काही सांगितलं तर विचारा, इतरांनी काही बोललं तर आमच्या प्रवक्त्यांना विचारा,” असे म्हणत त्यांनी बाकीच्या नेत्यांच्या विधानांना फारसे महत्त्व नसल्याचा स्पष्ट संदेश दिला.

ही प्रतिक्रिया संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर आली आहे. शिरसाट यांनी “2029 मध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढू शकतात,” असे सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. त्यानंतर उदय सामंत यांनीही “प्रत्येक पक्षाला वाढण्याचा अधिकार आहे,” असे म्हणत त्या विधानाला दुजोरा दिल्यासारखे संकेत दिले.

या पार्श्वभूमीवर फडणवीसांची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे. महायुती सध्या सत्तेत असली तरी पडद्यामागे वेगवेगळी गणितं सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.

2019 ला तुटलेली युती, 2022 मध्ये झालेलं बंड आणि 2024 चा विजय या सगळ्या पार्श्वभूमीवर आता 2029 चे समीकरण काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी “एकत्र आहोत” असा संदेश दिला जात असला तरी आतून वेगवेगळे सूर उमटत असल्याने राजकारण पुन्हा तापल्याचे दिसत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!