मोठी बातमी! शरद पवार यांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक, गुन्हे शाखेची कारवाई..

पुणे : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानं रविवारी अटक केली. यामुळे आता तपासाला गती मिळणार आहे.
सागर बर्वे असे धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव आहे. या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपी सागर बर्वे हा आयटी इंजिनीअर आहे. त्याने असे कृत्य का केले असा तपास आता सुरू झाला आहे.
अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं आहे. याप्रकरणी आरोपीला स्थानिक न्यायालयानं 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात मुंबई गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुढील तपास करत विविध पथकं तयार करण्यात आली होती.
आरोपीची कसून चौकशी सुरू असून आरोपीनं हे पाऊल का उचललं याचा शोध मात्र सुरू आहेत. याबाबत सुप्रीया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती.
दरम्यान, सागर बर्वे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असून त्यानंच दोन्ही अकाउंट तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे. लवकरच अजून माहिती समोर येईल.