मोठी बातमी! जेजुरी मोरगाव रस्त्यावर भयंकर अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू, वाहनांचा अक्षरशः भुगा…

मोरगाव : येथील जेजुरी मोरगाव रस्त्यावर अपघाताची भीषण घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जेजुरी रस्त्यावर झालेल्या या अपघातात हॉटेल मालकासह ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात गाड्यांचा अक्षरशः भुगा झाला आहे.
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर किर्लोस्कर कंपनीसमोर सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघाताने लोकांची एकच धावपळ झाली. यावेळी मोठी गर्दी झाली होती. हॉटेलच्या बाहेरील बाजूस भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
जेजुरी जवळच हा अपघात झाला आहे. पुण्यातील जेजुरी मोरगाव रस्त्यावर कार आणि पीक टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात एका महिलेसह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन मुलांसह पाच जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, या अपघातामुळे वाहनांची रांग लागली होती. घटनेनंतर याठिकाणी पोलीस दाखल झाले. त्यांनी लगेच त्यांनी वाहतूक सुरळीत केली. या भीषण अपघाने मात्र एकच खळबळ उडाली आहे.