मोठी बातमी! राज ठाकरे -उद्धव ठाकरेंच्यात “शिवतीर्थ” वर अडीच तास खलबत ; युतीचा मुहूर्त ठरला?


पुणे : गेल्या काही दिवसापासून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा रंगत असतानाच आता उद्धव ठाकरे यांनी आज ‘शिवतीर्थ’वर जाऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली असून महापालिका निवडणुकीसंदर्भात बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आल्या माहितीनुसार, कौंटुबिक भेटीनंतर ठाकरे बंधुंमध्ये आज पहिल्यांदाच राजकीय बैठक झाली आहे. महापालिका निवडणुकी संदर्भात दोन्ही ठाकरेंमध्ये बैठक झाली.या बैठकीला संजय राऊत आणि अनिल परबही उपस्थित होते. विशेष म्हणजे या भेटीनंतर आता येत्या दसरा मेळाव्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये युतीची अधिकृत घोषणा होऊ शकते अशी चर्चा आता सुरू झाली आहे.दरम्यान या भेटीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरेंसोबत मनसेबाबत चर्चा झाली आहे, मनसेबाबत हायकमांडसोबतच्या चर्चेनंतर निर्णय होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तर दुसरीकडे समविचारी पक्षांसोबत जाण्यासाठी नेहमीच तयार आहोत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

दरम्यान यापूर्वी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या कौटुंबीक भेटीनंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राजकीय भेट झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!