मोठी बातमी! अजित पवारांच्या जवळच्या आमदाराच्या हत्येचा कट उघड ; सूत्रधार कोण?


पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा धक्कादायक कट उघडकीस आला आहे. या हत्येच्या मुळाशी नेमकं कोण आहे याचा सखोल तपास करण्यासाठी सरकारने आता विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाने मोठ्या शस्त्रसाठ्यासह आरोपींना जेरबंद केले असले तरी या कटामागील सूत्रधार कोण, याचा तपास करण्याची मागणी आमदार शेळके यांनी थेट पावसाळी अधिवेशनात केली होती. या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार आज विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबत आदेश काढलेत. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्याकडे या एसआयटीचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. या पथकात सहायक आयुक्त विशाल हिरे, वरिष्ठ निरीक्षक कन्हैया थोरात, सहायक निरीक्षक हरीश माने, अंबरीश देशमुख तसेच चार अंमलदारांचा समावेश आहे.

आमदार सुनील शेळके यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेली सर्व माहिती या समितीला देण्याची तयारी दर्शवली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास होणे आवश्यक आहे. समितीने काटेकोरपणे तपास करून खऱ्या दोषीना उघड करावं असं त्यांनी म्हटलं आहे.माझा आरोपींशी कुठलाही वैयक्तिक वाद नाही. ते सर्वसामान्य कुटुंबातील असून इतका मोठा शस्त्रसाठा खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च कोण उचलतोय? नामांकित वकिलांची फी कोण भरतोय? त्यांना पाठबळ देणारा नेमका कोण आहे?” असे गंभीर सवाल उपस्थित करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली होती.या थेट मांडणीमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!