मोठी बातमी!पडळकरांना वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं ; मुख्यमंत्र्यांनी केली सक्तीची सूचना..

पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन आता राज्यातील वातावरण तापलं आहे. या वादग्रस्त वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता गोपीचंद पडळकर यांना फोन करून चांगलीच सक्तीची सूचना दिली आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याची माहिती स्वतः पडळकर यांनी दिली आहे.ते म्हणाले,. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला होता. त्यांनी मला अशी वक्तव्य करु नका, अशी सक्तीची सूचना मला दिली आहे. मी त्यांच्या सूचनेचे पालन करेन. मला मुख्यमंत्र्यांनी ज्या सूचना दिल्या आहेत, त्यांचं मी यापुढे पालन करणार आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट फोन केला होता. त्यांच्या आमदारांनी केलेल्या कृतीचा शरद पवारांनी निषेध व्यक्त केला. ज्या खालच्या थराला जाऊन टीका होत आहे, ती काही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अशा वाचाळवीरांना, खालच्या पद्धतीने टीका करणाऱ्यांना आवरा असंही शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पडळकर यांना फोन करून चांगलाच दम दिला.

गोपीचंद पडळकर काय म्हणाले होते?
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचाही अपमान केला. अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे. ये बघायला. तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यावर सध्या प्रतिक्रिया उमटत आहेत.