मोठी बातमी ! उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी , धमकीने मोठी खळबळ


 

मुंबई : मागच्या काही महिन्यापासून चित्रपट सृष्टीतील तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात फोन करून जीवे मनर्णयाची धमकी दिली होती अशातच आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनौ पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. ‘डायल 112’ (उत्तर प्रदेश सरकारने आपत्कालीन सेवांसाठी सुरू केलेला नंबर) वर मसेजद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने ‘मी मुख्यमंत्री योगी यांना लवकरच मारीन’, असे म्हटले आहे. या धमकीनंतर एकाच खळबळ उडाली होती.

धमकी मिळाल्यानंतर ‘112’ च्या ऑपरेशन कमांडरने सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी कलम ५०६, ५०७ आणि आयटी अॅक्ट ६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यातच अतिक अहमद घटनेनंतर युवोगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत मोठी वाद करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!