मोठी बातमी! मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटात अनेक नेते प्रवेश करत आहेत. शिवसेना पक्षाचा उद्या वर्धापनदिन आहे. वर्धापनदिनापूर्वी आज शिवसेना ठाकरे गटाचे वरळीत मोठे शिबिर पार पडणार आहे. यावेळी अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

काल शिशिर शिंदे यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता विधान परिषद आमदार मनीषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे. ठाकरे गटाला मोठे धक्के बसत आहेत.

ठाकरेंच्या महाशिबिराच्या दिवशी विधान परिषद आमदार मनीषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा सुरू आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

राज्यात अनेक प्रमुख महापालिकांची मुदत संपली आहे. विधान परिषद आमदार मनीषा कायंदे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. भाजपकडून २००९ ला सायन कोळीवाड्यातून त्या निवडणूक लढल्या होत्या.
त्यानंतर २०१२ साली त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१८ साली त्यांना ठाकरेंनी विधान परिषदेची जबाबदारी दिली होती. यामुळे ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
