मोठी बातमी! एमआयएम’चे इम्तियाज जलील उद्धव ठाकरेंच्या भेटीला ‘मातोश्री’वर, राजकारणात वेगळ्या चर्चेला सुरुवात…

मुंबई : राज्यातील एमआयएमचे नेते आणि संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील आज उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले आहेत. जलील सध्या मातोश्रीवर दाखल झालेले असून आता ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. यामुळे आता त्यांची भेट नेमकं कशासाठी आहे, याबाबत राजकीय चर्चा सुरु झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच ईदच्या अनुषंगाने संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या घरी शिवसेना ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे गेले होते. त्यावेळी त्यांच्यात बराच वेळ चर्चा देखील झाली होती आणि आता त्यानंतर इम्तियाज जलील हे मुंबईत मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. यामुळे नेमकं राजकारणात काय सुरु आहे, याबाबत चर्चा सुरु आहे.
या भेटी मागचं कारण नेमकं काय आहे ते अद्यापही समजलेलं नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीचं कारण काय? त्यांच्यात काय राजकीय चर्चा होणार? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. दरम्यान असेही सांगितले जात आहे, की, इम्तियाज जलील यांच्या मुलाचं लग्न आहे. या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ते मातोश्रीवर गेले असण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरे आणि इम्तियाज जलील यांच्या देखील थोडीफार ओळख आहे. त्यामुळे आपल्या मुलाच्या लग्नात त्यांना आमंत्रण देण्यासाठी जलील मातोश्रीवर गेले असतील, असं अंबादास दानवे यांनी म्हंटलं आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याबाबत लवकरच अधिकृत माहिती समोर येईल.