शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीएम किसानचा 21वा हप्ता ‘या ‘महिन्यात येणार, हप्ता वाढणार का? माहिती समोर…

पुणे : केंद्र सरकारची लोकप्रिय असणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये दिले जातात.या योजनेत ऑगस्ट महिन्यात सरकारने 20 वा हप्ता दिला, त्यानंतर 21 वा हप्ता कधी येणार याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहेत. त्यानंतर आता पी एम किसानचा 21 वा हफ्ता नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पूर्वीच्या वेळापत्रकानुसार सरकार दर चार महिन्यांनी हप्ता वितरित करत असे. 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये आला होता, त्यानुसार 20 वा हप्ता जूनमध्ये अपेक्षित होता. मात्र तो ऑगस्टमध्ये आल्याने 21 वा हप्ता ऑक्टोबर 2025 मध्ये येऊ शकतो. ऑगस्टच्या प्रत्यक्ष वितरणाच्या तारखेपासून मोजणी केली, तर 21 वा हप्ता नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 दरम्यान मिळण्याची शक्यता आहे.आत्तापर्यंत 20 हप्त्यांमधून 3.9 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी शेतकऱ्यांना वितरित झाला आहे. फक्त 20 व्या हप्त्यातच 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,500 कोटी रुपये थेट जमा झाले आहेत.
पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक मदत वाढणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. यावर आता कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत स्पष्ट केले की सध्या हप्त्याची रक्कम वाढवण्याचा कोणताही विचार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आहे त्या आर्थिक मदतीवरच समाधान मानावे लागणार आहे.
