मोठी बातमी! भाजपच्या आमदारावर गोळीबार, पत्नीसोबत फिरताना घडली घटना, उडाली खळबळ…

राजकारणातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूरचे भाजप आमदार सौरभ सिंग यांच्यावर गोळीबार झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली. सौरभ सिंग हे कास्ता विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्यावर लखीमपूर खेरी येथील शिव कॉलनी परिसरात गोळीबार झाला आहे.
याबाबत पोलीसांकडून तपास सुरू असून हल्लेखोरे पसार झाले आहेत. घराजवळच हा गोळीबार झाला असल्याचे समोर आले आहे. याबाबत आमदार सौरभ सिंग म्हणाले, नेहमीप्रमाणे ते पत्नीसोबत जेवण करून घराबाहेर फिरायला गेले होते. तेव्हा ही घटना घडली आहे.
त्यांना घरापासून जवळच दोन तरुण दारू पिताना दिसले. त्यांनी तरुणांना अडवल्यानंतर दोघांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर तरुणांनी पिस्तूल काढून गोळीबार केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यानंतर दोघेही दुचाकीवरून घटनास्थळावरून पळून गेले. आमदार सौरभ सिंह यांनी या घटनेला हत्येचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. ते म्हणतो, घटनेत त्याला टार्गेट करण्यात आले. मी रोज संध्याकाळी फिरायला जातो, हे अनेकांना माहिती आहे. याबाबत सखोल चौकशी करायला हवी.
घटनेच्या वेळी त्यांचा बाँडीगार्ड काही अंतरावर होता, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. परिसराचा दौरा केल्यानंतर ते रात्रीचे जेवण करून घरी परततात आणि दररोज पत्नीसोबत फिरायला जातात. हा दिनक्रम अनेकांना माहिती आहे. घरापासून 100 मीटर अंतरावर आले असता त्यांना दोन मुले दारू पिताना दिसली.
त्यानी दोन्ही मुलांना अडवल्यावर त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. एका मुलाने पिस्तूल काढले. दोघांनी गोळीबार करून दुचाकीवरून पळ काढला. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले जात आहेत. अजून त्यांचा शोध लागला नाही.
लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे. या घटनेनंतर स्थानिक जनता आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणी काही संशयित लोकांची चौकशी सुरू आहे.