मोठी बातमी!आयुष कोमकर हत्या प्रकरण ; कृष्णा आंदेकरचा शूटर मुनाफ पठाणला अटक..


पुणे : पुण्यातील नाना पेठ परिसरात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकरची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी कृष्णा आंदेकरचा जवळचा शूटर मुनाफ पठाणला अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,आयुष कोमकरला ठार मारण्यासाठी पिस्तुल पुरवल्याचा आरोप मुनाफ पठाण याच्यावर आहे. त्यामुळे या हत्याकांडात पठाणचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुनाफ पठाण हा कुख्यात गुंड आणि शुटर कृष्णा आंदेकर याचा जवळचा सहकारी असल्याची माहिती आहे.गुन्हे शाखेतील पोलिसांनी फरार आरोपी मुनाफ पठाणला ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी रचलेल्या कटातही पठाणचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी पुणे पोलिसांसमो कृष्णा आंदेकर शरण गेला. सध्या बंडु आंदेकरसह विरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली, त्यानंतर आता मुनाफ पठाणलाही पिस्तूल पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!