मोठी बातमी! राजस्थानमध्ये पुन्हा एकदा भीषण विमान अपघात, एकाच मृत्यू..

काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये भीषण विमान अपघात झाला होता. यामध्ये २५० जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना आता अजून एक धक्कादायक विमान अपघात घडला आहे. राजस्थानमधील चुरू येथे आज वायुसेनेचं एक विमान कोसळल्याची घटना घडली आहे. हा अपघात रतनगड मधील भानूदा गावामध्ये घडला.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विमानाच्या ढिगाऱ्यामध्ये एक मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह विमानाच्या पायलटचा असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर वायुसेनेचं एक पथक घटनास्थळी रवाना झालं आहे. राजस्थानातल्या रतनगड मधील भानूदा गावात हा भीषण अपघात घडला आहे. भारतीय वायुसेनेचं विमान पडले आहे.
हे विमान नेमकं कशामुळे पडले, याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आली नाही. पोलिसांकडून तातडीनं घटनास्थळी बचाव कार्याला सुरुवात झाली. मात्र अद्याप तरी या विमानाच्या पायलट संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. स्थानिक लोकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. चुरू जिल्ह्यातल्या रतनगढ तहसीलच्या बॉर्डरवर असलेल्या भानूदा गावात हा अपघात घडला आहे.

आकाशातून एक जळत असलेलं विमान खाली कोसळलं. हा अपघात इतका भीषण होता की, या विमानाचा मलबा तब्बल दोनशे फूट परिसरात विखूरला गेला, विमानाचे पार्ट दूरवर उडाले. जेव्हा अपघात झाला तेव्हा विमानात नक्की किती लोकं होते? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याबाबत तपास सुरु आहे.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं अपघातस्थळी गर्दी केली होती, या विमानामध्ये एक किंवा दोन लोक असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यापूर्वी दोन एप्रिलला गुजरातच्या जामनगर परिसरात भारतीय वायुसेनेचं जागवॉर प्लेन क्रॅश झालं होतं. दोन एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला होता.