मोठी बातमी! लाडक्या बहिणींसाठी सरकारचं आणखीन एक पाऊल ; व्यवसायासाठी मिळणार आता कर्ज,


पुणे : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणखीन एक मोठं पाऊल उचललं आहे.या योजनेतुन आता महिलांना व्यवसायासाठी 1 लाखांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे. महिलांना 0 टक्के व्याजदराने हा कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो. मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू झाली होती. या योजनेतंर्गत पात्र महिलांना 1500 रुपये दरमहा देण्यात येतात. हे पैसे DBT अंतर्गत थेट त्यांच्या खात्यात जमा होतात. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. ग्रामीण भागातील महिलांना त्याचा लाभ मिळत आहे. मात्र या योजनेतील बोगसगिरी थांबवण्यासाठी ई -केवायसी करन बंधनकारक आहे.सध्यालाडक्या बहिणींना निकषांना आणि ई-केवायसीला सामोरे जावं लागत असलं तरी सरकारने त्यांच्यासाठी अजून एक मोठं पाऊल टाकलं आहे. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येणार आहे. त्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई आणि जवळपासच्या क्षेत्रात त्याची अंमलबजावणी होत असताना राज्यातही लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

मुंबई बँकेने 3 सप्टेंबरपासून ही योजना लाडक्या बहिणींसाठी सुरू केली आहे. या योजनेत 1 लाखांपर्यंतचे कर्ज शुन्य टक्के व्याजदराने देण्यात येत आहे. सध्या योजना मुंबई शहर आणि उपनगरामध्ये लागू आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये लवकरच योजना लागू होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरु करता येणार आहे. यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!