मोठी बातमी! मित्र फिरोजवर रागाचा बदला, मुंबई उडवण्याची धमकी देणारा ज्योतिषी आश्विनला नोएडातून अटक, मुंबईत आणून चौकशी सुरु


मुंबई : ऐन अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली होती. मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर धमकीचा मेसेज आला होता. त्यानंतर सतर्क झालेल्या मुंबई पोलिसांनी अखेर आरोपीला नोएडातून अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.आरोपीचं नाव अश्विनी कुमार (वय ५१) असून तो बिहारचा रहिवासी आहे. तो मागील पाच वर्षांपासून नोएडामध्ये राहतो आणि ज्योतिषी म्हणून काम करतो, अशी माहिती पोलीस चौकशीतुन समोर आली आहे. त्याला मुंबईत आणल असून पोलिस त्याची कसून चौकशी करत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या व्हाट्सअपवर धमकीचा मेसेज पाठवणाऱ्या अश्विन विरोधात त्याचा मित्र फिरोज याने 2023 मध्ये पटना येथे गुन्हा दाखल केला होता ज्यामुळे अश्विनला तीन महिने तुरुंगात राहावं लागत होत. त्या रागातूनच त्याने मुंबई पोलिसांना खोटी धमकी पाठवून फिरोजला फसवण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.अश्विनीने हा मेसेज दहशतवादी हेतूने नव्हे, तर वैयक्तिक सूड उगवण्यासाठी पाठवला होता. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आले असून मुंबईत आल्यानंतर त्याची कसून चौकशी सुरू आहे.अश्विनीच्या ताब्यातून पोलिसांनी सात मोबाईल फोन, तीन सिम कार्ड, सहा मेमरी कार्ड होल्डर, दोन डिजिटल कार्ड आणि इतर साहित्य जप्त केलं आहे.

मुंबई पोलिसांना आलेल्या ५ सप्टेंबर रोजी वॉट्सअॅपवर एक धक्कादायक मेसेज आला. त्यात लिहिलं होतं की, लश्कर-ए-जिहादचे १४ दहशतवादी मुंबईत शिरले आहेत. त्यांनी ४०० किलो आरडीएक्स आणलं असून ३४ गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब बसवले आहेत. लवकरच स्फोट होऊन मुंबई हादरेल. एवढंच नव्हे तर या स्फोटांत तब्बल एक कोटी लोकांचा बळी जाईल, असंही त्यात म्हटलं होतं. त्यामुळे मुंबई पोलिसांनी बंदोबस्त तैनात केले होते. अखेर नोएडात ज्योतिषी म्हणून काम करणारा अश्विन सध्या मुंबईत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीत आणखीन काय माहिती मिळते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!