मोठी बातमी! कोकणातील 6 नेत्यांचं भाजपमधून निलंबन ; निलेश राणे आक्रमक..

सिंधुदुर्ग : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना कोकणातील सहा नेत्याचं भाजपमधून निलंबन करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांचं निलंबन करण्यात आल आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथील सहा नगरसेवकांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत भाजप जिल्हाध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली. आठ पैकी सहा नगरसेवकांचे पक्षातून निलंबन करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. भाजप जिल्हाध्यक्षांनी निलंबनाच्या कारवाईचे पत्र हे थेट जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने वातावरण तापले आहे. भाजप जिल्हाध्यक्षांनी केलेल्या निलंबन कारवाईच्या पत्राला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिलेदार आमदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपच्या सहा नगरसेवकांच्या मदतीसाठी आता त्यांनी पुढाकार घेतला आहे.
याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत असे म्हटले आहे की,’आम्हाला ज्या दिवशी खासदार नारायण राणे सांगतील त्या दिवशी आम्ही निलंबन मान्य करू. सिंधुदुर्गात भाजपचे निर्णय हे खासदार राणे साहेब घेत असतात, म्हणून या पत्राला आम्ही किंमत देत नाही’, अशा स्वरूपाचे प्रत्युत्तर शिवसेना कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी दिलं आहे. दरम्यान या सहा नगरसेवकांच्या निलंबनाचा मुद्दा आता नारायण राणे यांच्या कोर्टात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
