मोठी बातमी! दहावीचा निकाल जाहीर, ‘या’ ठिकाणी पहा निकाल
पुणे : सर्वांचे लक्ष लागलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE ने 10 वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा आता संपली आहे. CBSE ने आज 10 वीचा निकाल जाहीर केला. यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
याआधी CBSE ने 12 वीचा निकाल जाहीर केला होता. CBSE ने विद्यार्थ्यांसाठी अधिकृत वेबसाईट cbse.nic.in वर निकाल उपलब्ध करून दिला आहे. विद्यार्थी आपला निकाल तिथे पाहू शकतात.
दरम्यान, CBSE 10 वाचा निकाल वेबसाईट व्यतिरिक्त एसएमएमद्वारे देखील पाहू शकतात. यासाठी विद्यार्थी cbse 10 रोल नंबर स्कूल नंबर सेंटर नंबर टाईप करून 7738299899 या क्रमांकावर पाठवा.
यंदाच्या निकालावर देखील मुलींची छाप दिसत आहे. मुलींनी बाजी मारली आहे. एकूण 90.68 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर मुलांची टक्केवारी 84.67 टक्के आहे. यामुळे मुलींनी एकच जल्लोष केला.
Views:
[jp_post_view]