संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी माहिती समोर, प्रकरणातून दोघांना वगळले, ‘ते’ दोघे कोण? जाणून घ्या..


बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सीआयडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. या 1800 पानाच्या आरोपपत्रात सीआयडीने संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणातून दोघांची नावे वगळण्यात आली आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

सिद्धार्थ सोनावणे आणि रणजित मुळे या दोघांना आरोपपत्रातून वगळलं आहे. त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे आढळले नसल्याने त्यांना वगळण्यात आलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. CID च्या आरोपपत्रानुसार, वाल्मिक कराड हा या हत्येचा प्रमुख सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामुळे आता या प्रकरणाला वेग येणार आहे. याबाबत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. संतोष देशमुख यांना सुदर्शन घुलेने मारहाण करतानाचा व्हिडीओ CID कडे आहे. या व्हिडीओच्या आधारे तपास अधिक पुढे नेण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात असून, आरोपींवर कठोर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

CID पुढील काही दिवसांत आणखी पुरावे गोळा करून न्यायालयात सादर करणार असल्याचे समजते. तपासात पाच साक्षीदारांनी महत्त्वपूर्ण जबाब नोंदवले असून, त्यामध्ये वाल्मिक कराड विरुद्ध ठोस पुरावे समोर आले आहेत. बीड शहरात कराडची दहशत असल्याचेही CID ने आरोपपत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, सुदर्शन नावाच्या व्यक्तीच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणीची मागणी केली होती. ६ डिसेंबरला संतोष देशमुख, सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि सांगळे यांच्यात जोरदार वाद झाला. CID च्या आरोपपत्रात या घटनेचा स्पष्ट उल्लेख आहे. याबाबत CID च्या तपासात असे निष्पन्न झाले आहे की, अवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!