लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती आली समोर, पाच महिन्यात….


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

महायुतीसाठी ही योजना चांगली लाभकारक ठरली असली तरी विरोधकांनी त्यावरून आक्रमक भूमिका घेत योजनेला विरोधही दर्शवला होता. मात्र तरीही राज्यातील कोट्यावधी महिलांनी या योजनेसाठी अरज केला, त्यापैकी २ कोटींपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आणि दरमहा १५०० रुपये त्यांच्या खात्यात जमा होत आहेत.

अशातच आता या योजनेबद्दल आता एक नवी , मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेकडे महिलांनी पाठ फिरवली की काय ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण गेल्या ५ महिन्यांत या योजनेसाठी एकही नवा अर्ज आलेला नाही. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

महायुतीच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी एक असलेल्या आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळवून देण्यास कारणीभूत ठरलेल्या लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वर्षभरापासून कोट्यावधी महिलांना या योजनेचा लाभ घेतल्याने दरमहा १५०० रुपये त्यांच्या खात्यातही जमा झाले,.

महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. मागील लोकसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि प्रभावी अंमलबजावणीकडेही लक्ष दिले.

याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. न भूतो असा विजय महायुतीचा झाला. परंतु, यानंतर या योजनेची छाननी करून लाखो अपात्र लाभार्थी महिलांना वगळण्यात आले.

मात्र, आता याच लाडकी बहीण योजनेची क्रेझ ओसरली का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे गेल्या पाच महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी एकही नवा अर्ज केला नसल्याचा दावा केला जात आहे. यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींनी या योजनेकडे पाठ फिरवली का, अशी कुजबुज सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!