ब्रेकिंग! राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी, अजित पवारांना प्रदेशाध्यक्षपद तर विरोधी पक्षनेतेपद…?


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष पद दिले. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. तसेच इतरांना देखील जबाबदाऱ्या दिल्या होत्या. असे असताना अजित पवार यांना जबाबदारी दिली नव्हती.

यामुळे ते नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पद नको, तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी देण्याची मागणी केली होती.

त्यांच्या या मागणीवरून त्यांची नाराजी उघड झाली. आता शरद पवार पुन्हा भाकरी फिरवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. असे असताना आता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यपदासाठी अजित पवार तर विरोधी पक्षनेतेपदासाठी धनंजय मुंडे यांच्या नावाची सध्या चर्चा राजकीय गोटात सुरु आहे.

यामुळे आता पक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष ललागले आहे. याच पार्शवभूमीवर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक होणार आहे. राज्यात लवकरच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. जर अजित पवार नाराज राहिले तर त्यांच्या नाराजीचा फटका पक्षाला बसू शकतो.

यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्याची तयारी सुरु आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांना कोणतीच जबाबदारी दिली नव्हती. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!