आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय! जाणून घ्या…

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये राज्य कामगार विमा महामंडळाच्या दोनशे खाटांच्या विमा कामगार रुग्णालय उभारणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे करोडी येथील सहा हेक्टर गायरान जमीन देण्यात आली आहे.

याशिवाय बिबवेवाडी- पुणे, अहिल्यानगर, सांगली-अमरावती, बल्लारपूर-चंद्रपूर, सिन्नर-नाशिक, बारामती, सातारा आणि पनवेल येथील रुग्णालयांना जमीन देण्यास तत्वतः मान्यता (महसूल विभाग) देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास पथकराच्या सवलतीसाठी भरपाई मिळणार.
मुंबई प्रवेशद्वाराच्या पाच पथकर स्थानकावर सवलत दिल्यामुळे महामंडळास द्यावी लागणारी भरपाई. (सार्वजनिक बांधकाम विभाग) महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना. आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास मान्यता. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार. (आदिवासी विकास विभाग)

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला येथील ८.५ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणांना मान्यता. (महसूल विभाग) असे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. लवकरच ही कामे सुरू होणार आहेत.