सप्तशृंगी देवी संस्थानचा मोठा निर्णय, नवरात्रौत्सवात सप्तशृंगी देवीच मंदिर भाविकांसाठी २४ तास खुलं राहणार…


नाशिक : सप्तशृंगी देवी विश्वस्त संस्थानने भाविकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. नवरात्रोत्सवात भाविकांना सप्तशृंगीदेवी चे २४ तास दर्शन खुले राहणार आहे. तसेच सर्व शासकीय अधिकारी, सप्तशृंग निवासिनी ट्रस्ट विश्वस्त, व्यवस्थापक ग्रामपंचायत आदींच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

ही बैठक ट्रस्टच्या चिंतन हॉल येथे घेण्यात आली. संबधित विभागांनी यात्रा कालावधीत आपली जबाबदारी चोख पार पाडण्याचे आदेश नरवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

चोख बंदोबस्तात नवरात्र उत्सव पार पाडण्यात येणार आहे. भगवतीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी खास सोय म्हणून मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान दहा ते बारा लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतील असा प्राथमिक अंदाज प्रशासनाच्या वतीने व्यक्त केला जात आहे. यात्रा कालावधीत नांदूरी येथे वाहन पार्किंग ची व्यवस्था करण्यात येणार आहे.

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळख असलेल्या सप्तशृंगी देवीचा मोठा भक्त वर्ग आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ म्हणून आणि खान्देशवासियांचे कुलदेवी आहे. सप्तशृंगी देवीला श्री भगवती माता म्हणून ओळखले जातात, तर कुणी वणीची देवी म्हणून देखील ओळखतात.

नवरात्रात लाखो भाविक पायी दर्शनाला येत असतात.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तश्रृंगी देवीचा गडावर खान्देशसह, अहमदनगर, नाशिक, पुणे, औरंगाबाद येथून भाविक येतात.

सप्तशृंगी देवीची स्वयंभू मूर्ती असल्याचे सांगतात, त्यामुळे नवसाला पावणारी देवी असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!