साई भक्तांसाठी मोठी बातमी!! दुहेरी हत्याकांड प्रकरणानंतर साई संस्थानचा मोठा निर्णय, शिर्डीला जाण्याआधी जाणून घ्या…

शिर्डी : गेल्या काही दिवसांपासून शिर्डीतील साईबाबा संस्थान चर्चेत आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांना लुटीच्या उद्देशाने मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला करीत त्यांची निर्घृण हत्या केली आहे.
अशातच आता भक्तांना मिळणार भोजनप्रसादाचे कूपन आता दर्शन रांगेत मिळणार आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने उचललं महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगण्यात येत आहे. भक्त निवासात राहणाऱ्या भक्तांनाही या कूपनच वितरण करण्यात येणार असल्याच संस्थानने सांगितलं आहे.
आज पासून पहाटेच्या काकड आरती नंतर भोजनाच्या कूपन वाटपाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. प्रसादलयात जेवणासाठी आता साईभक्तांना कूपन आवश्यक असणार आहे.
शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या अगोदर जेवणासाठी कुणालाही प्रसादालयात सहज प्रवेश मिळत असे. खासदार सुजय विखे पाटील यांनी वाढत्या गुन्हेगारीला लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, साई प्रसादालयात दररोज ५० ते ६० हजार भाविक मोफत भोजनाचा लाभ घेतात. पण प्रसादालयात जेवणासाठी आता कूपन आवश्यक आहे. दुहेरी हत्याकांड तसंच सुजय विखे यांच्या वक्तव्यानंतर साई संस्थानने हा निर्णय घेतला आहे. याआधी मोफत जेवणासाठी प्रसादालयात थेट प्रवेश होता, पण वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.